आधुनिक जीवनशैली मानवी शरीरामध्ये अनेक आजारांना निमंत्रण देते. बैठे काम, कॉम्प्युटर, मोबाइल, लॅपटॉप व व्यायामाचा अभाव, चुकीच्या बसण्याच्या सवयी या बाबींमुळे मानेच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. मानदुखी हा त्यातलाच एक महत्त्वाचा आजार आहे. पुरुषांमध्ये व बहुतांश ऑफिस काम करणाऱ्या तरुण व्यक्तींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. आजच्या या लेखात मानेचे दुखणे या विषयी आपण जाणून घेणार आहोत. पेन क्लिनिकमध्ये मानेच्या अनेक आजारांवर विना शस्त्रक्रिया, संपूर्णतः भूल न देता उपचार केले जातात.
डायबेटिस व ऑस्टिओआरथ्रायटिस हाडाची झीज हेही महत्त्वाचे कारण आहे, तसेच दोन मणक्यांतील सांध्याची झीज होणे, मणका सटकणे इत्यादी.
मानेत दुखणे, मानेचे दुखणे खांद्यात अथवा दंडात येणे, मानेचे दुखणे संपूर्ण हातात येणे, हाताला मुंग्या येणे, बधीरपणा वाटणे, हातातून वस्तू सुटणे, सारखी मान मोडण्याची इच्छा होणे, कधी चक्कर येणे, डोकेदुखी होणे आदी स्पाँडिओलिसीसची लक्षणे असू शकतात.
मानेतील गादी सरकल्यामुळे जर नस दाबली जात असेल, तर एपिड्युरल इंजेक्शनद्वारे ती नस मोकळी करता येते. मणक्यातील सांध्यांची झीज झाली असेल व फक्त मणक्यात, मानेत दुखत असेल; परंतु मुंग्या वगैरे हाताला काही त्रास जाणवत नसेल, तर रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे हा सांधा वेदनारहित करता येतो.
या उपचार पद्धती विना ऑपरेशन व एका दिवसाच्या आहेत. पूर्ण भूल द्यावयाची गरज पडत नाही. काहीही साइड इफेक्ट नाहीत. कारण हे उपचार सी-आर्म मशीनद्वारे अचूकरीत्या तज्ज्ञांद्वारे केल्या जातात. औषधांचे प्रमाण योग्य असल्याने इतर अवयवांवर परिणाम होत नाही. यानंतर फिजिओथेरपीच्या सल्ल्याने योग्य व्यायाम नियमित केल्यास पुन्हा त्रास उद्भवत नाही.